एक लहान मुलगा हरवलाय.....
झाली असतील दहा-पंधरा वर्षं!
तेव्हापासून शोधतोय त्याला..
सापडतच नाही!
तो होता तेव्हा त्याचं आणि माझं विश्व किती छान होतं!
तो म्हणजे प्रचंड उर्जा! प्रचंड सळसळ! प्रचंड उत्साह! शून्य कपटीपणा, निर्व्याज वागणं! हरवला.......
मी त्याला कॉलेजला जाणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला नोकरी शोधणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला घरापासून दूर राहणा-या मुलांमध्ये शोधतो.
मी त्याला त्याची वाट बघणा-या आईबाबांच्या डोळ्यांमध्ये शोधतो.
मित्रांच्या घोळक्यात शोधतो,
नाक्यावरच्या टोळक्यात शोधतो.
बाजारात शोधतो,
मंदिरात शोधतो.
नोटा-नाण्यात शोधतो, तेलाच्या घाण्यात शोधतो.
उसाच्या चरकात शोधतो, घाण्याच्या बैलात शोधतो.
कॉर्पोरेट कंपन्यात शोधतो, रस्त्यावरच्या कामगारात शोधतो.
चेहे-यावरच्या मुखवट्यात शोधतो, व्यवहाराच्या कपट्यात शोधतो......
आणि खूपदा स्वत:च्या आत शोधतो......
अजून सापडत नाहीये!
-प्लीज कुणीतरी शोधा रे त्याला!
8 comments:
अप्रतिम.. खुपच सुरेख..
"एक लहान मुलगा हरवलाय" ही कल्पनाच जाम आवडली मला..
धन्यवाद हेरंब, अरे आपण असतो काय सगळे लहानपणी आणि मोठेपणी होतो काय! सगळे modify होतो. एकाच छापाच्या गणपतींसारखे, ओल्या मातीला कोण व्हावसं वाटतं हे कुणी विचारातच घेत नाही!
Very interesting writeup!
पोस्ट खूप छान झाली आहे.
Great.. Now I am somehow able to put comment..
@मकरंद,अनिकेत, धन्यवाद!
सुंदर...ज्याला आपल्यातील लहानपणा जपता आला तो भाग्यवान ! प्रयत्न करत राहा...
धन्यवाद सागर!
टिप्पणी पोस्ट करा