परवा सकाळी नेहेमीप्रमाणे ऑफिसला गेलो. एक प्रॉब्लेम फिक्स करत असतानांच बॉसचा फोन आला.
"काय रे आज तुझा वाढदिवस आहे?"
"हो" - मी.
"मग काल बोलला नाहीस तू!"
"त्यात काय सांगायचं!"
"आत्ता सुट्टी घे,घरी जा! आज तुझा दिवस आहे! एन्जॉय!"
"खरंच?"
"अरे अगदी खरं! कामाचं आपण नंतर पाहू! जा तू!"
स्तंभित, आश्चर्यचकित वगैरे वगैरे सगळी विशेषणं वापरून संपली माझी! अचानक सुट्टी? आत्ता प्रश्न पडला की या अंगावर आलेल्या सुट्टीचं काय करायचं? वीकएंडसाठी राखून ठेवलेली कामं आठवायला लागली. हे करू की ते करू! तस पाहिलं तर कुठल्याच कामाला वेळ पुरणार नव्हता! १२ वाजलेले होते, अर्धा दिवस तर असाच गेला! मग विचार केला, मरूदेत ती कामं, आज जगावा एक उनाड दिवस, आपलाच वाढदिवस...! किती दिवसात स्वत:करता जगलोच नाही आपण!
सरळ घरी आलो. मित्रांना फोन करून उपयोग नव्हता. सगळे ऑफिसमधे! मग घरी असणा-या काही मित्रांना सोबत घेतलं आणि सरळ पुणे सेंट्रल गाठलं. म्हटलं चला विंडो शॉपिंग करुयात. चकचकीत मॉलमधल्या भपकेबाज वस्तू पहात हिंडत होतो. परवा १ तारीख होती! त्यामुळे मॉलमध्ये ही गर्दी! किती अनावश्यक वस्तू खरेदी करून घराचं गोडाऊन करून टाकतात लोक! मी विचार केला, यातल्या किती वस्तू घरात असायलाच हव्यात? उत्तर आलं, पन्नास टक्क्यापेक्षा नाही! काही अडत नाही या वस्तू घरात नसल्या तरी!
तिथून परत आलो आणि घरी येऊन शांत बसून राहिलो. काहीही न करता, मनात कुठलाही विचार न आणता फक्त शांत बसून होतो. आजूबाजूची शांतता कानांनी टिपून घेत होतो. शांततेलाही स्वत:चा एक नाद असतो. आपण कधी ऐकतच नाही. योगी व्यक्ती ज्या समाधीबद्दल बोलतात ती बहुतेक हीच असावी. खडकातून झिरपणा-या पाण्यासारखी शांतता आत झिरपत होती. किती अद्भूत अनुभूती असते ती! कितीतरी वेळ मी त्याच अवस्थेत बसून होतो. मन निर्विचार होत होतं. खरंच खूप हलकं वाटलं. एकूण दिवस लक्षात राहण्यासारखा गेला.
10 comments:
शुभेच्छा...
वाढदिवसाच्या आणि एका उनाड दिवसाच्या,
छान आहे लेख तुमचा
पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
धन्यवाद नागेश!
वाढदिवसाच्या शुभेच्छा...
Vadhdivasachya Shubhechhaa...!!!
:-)
शांततेचा आवाज! सही आहे....वेळच मिळत नाही न आजकाल, हि शांतता experience करायला ... सतत डोक्यात काही न काही विचार चालू असतात ..
wish you HAPPY B'DAY......
lekh chan aahe
shantatelahi aavaj asto he shantata anubhavnaryala kalt lucky aahat thumi........
sushma
@मनमौजी,मैथिली,N,सुषमा धन्यवाद![:)]
shantatecha aawaj aaikayla bhagya lagata & vel hi....
best bloging...
अगदी बरोबर नेत्रा! धन्यवाद!
धन्यवाद सुषमा!
टिप्पणी पोस्ट करा