शुक्रवार, २५ मार्च, २०११

दे घुमा के... वर्ल्डकपच्या बाहेर!अफलातून.... आज शब्दच सापडत नाहीये भारताच्या विजयाचं वर्णन करायला! त्य हलकट ऑस्ट्रेलियाला सरळ उचलून वर्ल्डकपच्या बाहेर फेकून दिलं हे फारच छान झालं. पॉंन्टिंगची अवस्था तर बघवत नव्हती. प्रत्येक बॉलगणिक त्याच्या चेहे-यावरचा त्रागा वाढत होता. सगळा चिडीरडीचा डाव खेळूनसुद्धा जिंकता येत नाही म्हणजे काय? सचिनचा कॅच आपण टप्पा पडल्यानंतर पकडला आहे हे त्या मूर्खाला कळत नव्ह्तं का, की त्याने रेफरलची मदत मागितली? टेक्नॉलॉजीला मूर्ख समजतोय का हा? उगीच एक रेफरल वाया घालवला! जाऊ द्या, संतापात माणूस असंच काहितरी करत असतो...असंबद्ध!
पण हे फार छान झालं की ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपच्या बाहेर! पॉन्ट्याने कधी कल्पना तरी केली होती का? जिओ टीम इंडिया!
आणि अजून ... देवाच्या १८००० धावा पूर्ण झाल्या! त्यापण जगातल्या सगळ्यात हलकट टीमविरुद्ध!

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा