पांढरे निशाण उभारण्याची,
घाई करु नकोस,
मूठभर हृदया,
प्रयत्न कर,
तगण्याचा, तरण्याचा,
अवकाश भोवंडून टाकणा-या,
या प्रलयंकारी वादळाचाही,
एक अंत आहे,
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत,
लढत रहा,
तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी,
वादळे यासाठीच वापरायची असतात,
आपण काय आहोत,
ते तपासण्यासाठी नव्हे,
काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी..
-पद्मा गोळे.
1 comments:
ही कविता संजीवनी बोकील यांची आहे,पद्मा होळे यांनी कधीही लिहिली नाही. कृपया खुलासा करा.
टिप्पणी पोस्ट करा