विशालभाऊंची ही पोस्ट वाचली आणि वाटलं की इतरही खान्देशी खाद्यपदार्थांची ओळख करुन द्यावी. खान्देशमधे तिखट पदार्थ मोठ्या प्रमाणावर खातात. इथलं तिखट नुसतं जहाल नसतं तर त्याला एक छान झणझणीतपणा असतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे शेवभाजी! इथे पुण्यात मिळणारी शेवभाजी म्हणजे ग्रेव्हीची असते. त्यात मोठ्या प्रमाणात टमाट्याचा वापर केलेला असतो. ज्याने खान्देशी शेवभाजी खाल्लेली आहे त्याला ही मिळमिळीत शेवभाजी अजिबात आवडणार नाही. कारण मुळात शेवभाजीत टमाटे वापरतच नाहीत! पुण्यात कोथरुडला जे "खान्देश" नावाचं हॉटेल आहे तिथे खरी खान्देशी शेवभाजी मिळते. कधीतरी खाऊन बघा! त्याशिवाय सांगवीत संगम, खान्देश एक्स्प्रेस अशी काही हॉटेल्स आहेत जिथे खास खान्देशी शेवभाजी मिळते.
काल रविवार असल्याने काहीतरी झणझणीत खायचा मूड झाला होता. हो नाही करता करता शेवभाजी करायचं ठरलं. खान्देशात भाजीसाठी जी स्पेशल "तुरखाटी शेव" मिळते ती इथे पुण्यात मिळत नाही, त्यामुळे त्यातल्यात्यात जी बरी शेव आहे ती वापरुन शेवभाजी करायचं ठरलं आणि लागलो कामाला! (अर्थात बायकोच आणि मीसुद्धा!)
शेवभाजी जमण्यासाठी तिची ग्रेव्ही आधी नीट जमली पाहिजे; तरच त्या शेवभाजीला चव येते. ही पाककृती देतोय:
वाढणी: चार जणांसाठी
साहित्य: चार मोठे कांदे,
अर्धी वाटी तीळ,
दोन तमालपत्र,
चार मिरे,
दोन लवंगा,
अर्धी वाटी धणे,
दोन बाजा,
थोडं दगडफूल,
चिमूटभर हळद,
चिमूटभर मोहोरी
चिमूटभर हिंग,
अर्धी वाटी कोथिंबीर,
अर्धी वाटी सुकं खोबरं काप करुन
२५० ग्रॅम भाजीची शेव (दुकानदाराकडे खास मिळते. जाड आणि लालभडक असते).
चार चमचे तिखट (कमी वाटल्यास वाढवू शकता)
१ वाटी तेल
१ लिटर उकळतं पाणी

कृती: कांदे बारीक चिरुन घ्या. कढईत थोडं तेल टाका, चिमूटभर मोहोरी टाका,मग हिंग टाका. मोहोरी तडतडली की त्यामधे कांदे तेलावर परतून घ्या. कांदा लालसर होत आला की बाकीचे जिन्नस टाकून परतत रहा. चिमूटभर हळद टाका. चांगला सुगंध यायला लागला की हे पदार्थ कढईतून उतरवून मिक्सरमधे अगदी थोडंसं पाणी टाकून अगदी बारीक वाटून घ्या. (खरंतर याला पाटा-वरवंटाच हवा, पण तो सगळीकडे मिळतोच असं नाही. त्यामुळे... पण पाटा-वरवंट्यावर वाटलेल्या मसाल्याला एक छान चव येते!) आता कढईत उरलेलं तेल टाकून हा वाटलेला गोळा त्यात परता. आच धीमी ठेवा नाहीतर मसाला करपू शकतो. एकीकडे पाणी उकळत ठेवा. मसाल्याचा गोळा कडेने तेल सोडू लागला आणि त्याचा छान सुगंध येऊ लागला की मसाला तयार झालाय असं समजावं. या मसाल्यात उकळतं पाणी थोडंथोडं करुन कडेकडेने सोडा. थंड पाणी टाकलं तर भाजीचा रंग जातो. चांगली उकळी येऊ द्या. चांगलं उकळलं की कढई गॅसवरुन खाली उतरवा. हा झाला रस्सा तयार.

जेवायला बसतांना वरुन शेव पेरा आणि एक उकळी आणा. जास्त उकळू नका. शेव विरघळू शकते. वरुन मस्त चिरलेली कोथिंबीर पेरा आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर ... हाण सावळ्या!

जेवायला बसतांना वरुन शेव पेरा आणि एक उकळी आणा. जास्त उकळू नका. शेव विरघळू शकते. वरुन मस्त चिरलेली कोथिंबीर पेरा आणि गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर ... हाण सावळ्या!

6 comments:
आजी मुंबईत नेहमी ही भाजी करायची , लहानपणी खाल्लेली ही चव आजही आमच्या लक्षात आहे.
आम्ही अजूनही नेहेमी करतो ही भाजी! प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! :)
baajaa mhanaje kaay ?
baja mhanje kai
Information in Marathinice information sir
टिप्पणी पोस्ट करा