असं म्हणतात की मासा आणि विदुषक हे जगातले सगळ्यात दु:खी जीव आहेत. कारण पाण्यात असल्यामुळे माशाचे अश्रू कुणाला दिसू शकत नाहीत. विदुषकाचं पण तसंच! आत कितीही आक्रंदणारं मन असलं तरीही मुखवटा कायम हसरा ठेवावा लागतो. आपण सगळे सर्कशीतल्या विदुषकावर हसतो. त्याच्या एन्ट्रीलाच हसू फुटतं. ९९% वेळेस ते हसू त्याच्या व्यंगावर असतं. स्वत:च्या व्यंगाची अशी जाहीर खिल्ली उडू देणं याला तितकंच मोठं मन लागतं. त्याला प्रत्येक वेळेस जे पिंच होत असतं ते तो मनातच ठेवून प्रेक्षकांना हसवण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात थोडंसं आनंदाचं कारंज निर्माण करण्यासाठी धडपडतो.
आज अशाच एका महान व्यक्तिमत्वाचा जन्मदिवस आहे, ज्याने आपल्या प्रत्येकाला कधी ना कधी हसवलेलंच आहे. त्याचं नाव आहे... चार्ली चॅप्लीन!

प्रचंड आईवेडा होता तो! तुमच्याआमच्यासारखाच! त्याला मानाचा मुजरा! चार्ली, खरंच तू आम्हाला हसायला शिकवलंस! व्हेरी थॅंक्स टू यू! अॅंड विश यू अ व्हेरी हॅप्पी बर्थडे!
चार्लीबद्दलची अजून माहीती
इथे वाचा:
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा