मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

युअर आयडी इज हॅक्ड!

परवा ऑफिसमध्ये माझी असली तंतरली....
झालं असं की मी ऑफिसला आलो, नेहेमीप्रमाणे पी.सी. ऑन केला आणि जी-टॉकला लॉगिन झालो..........
....आणि माझ्या मेलबॉक्स मध्ये एक स्टार केलेला मेल होता.

"युअर आयडी इज हॅक्ड! "
सो, सून चेंज युअर आयडी .......
प्लीज नोट आय़ हॅव ऑल युअर कॉन्टॅक्ट्स!

थॅंक यू फ़ॉर युवर हेल्प.

हॅकर, सॅन फ्रान्सिस्को.


मी तो मेल परत परत वाचला. तो माझ्याच मेल आयडी वरून मलाच पाठवलेला होता. काही कळेना. क्षणभर डोकं बधीर झालं. नुसता सुन्न झालो.मला काही कळेचना असं काय झालं. काल तर लॉगआउट व्यवस्थित करून गेलो होतो. तेवढ्यात कलिग आला. त्याला संगितलं. तो पण विचार करायला लागला. त्याने त्याचा मेलबॉक्स उघडून बघितला तर त्याला माझ्या आयडीवरून मेल आला होता की हा मेल आयडी हॅक झाला आहे. एक एक करत ऑफिसचा प्रत्येक जण हेच सांगू लागला. मग मात्र माझं धाबं दणाणलं. प्रत्येक जण आपापल्या पध्दतीने उपाय सुचवत होता. शेवटी मी पासवर्ड चेंज केला, सेटींग्समधे जाऊन आणखी काही काही चेंजेस केलेत.आणि परत ऑफिसच्या कामाला सुरुवात केली. पण काही मन लागेना. म्हटलं सगळे कॉन्टॅक्ट्स याच्या हाती लागले तर हा काहीही गोंधळ माजवू शकेल. कुणाकुणाला कसले कसले मेल पाठवू शकेल. काय करावं बरं? विचार करकरून वैतागून गेलो. शेवटी कामावर लक्ष केंद्रीत केलं. पण धाकधुक होतीच.
संध्याकाळी आठवणीने लॉगआउट केलं आणि जायला निघालो, तितक्यात एक कलीग बॉसला म्हणाला की याचा मेल आयडी आज हॅक झाला म्हणून! बॉसला पण आश्चर्य वाटलं. मग बॉस मला हळूच म्हणतो, "आता कधी लॉगआऊट न करता जाशील का?" आणि तो हसायला लागला. एक एक करत सगळेच हसायला लागले.
..........तेव्हा माझ्या लक्षात आलं की घोळ इथेच आहे.मी एकदम बावळट चेहेरा करुन सगळ्यांकडे बघू लागलो. तेव्हा माझ्या कलिगने सांगितलं की नेमकं काय झालं.
मी आदल्या दिवशी निघतांना बॉसशी बोलत होतो. तेव्हा बराच वेळ मी माझ्या पी.सी. वर नव्हतो. त्यामुळे थोडया वेळानं मॉनिटर आपोआप बंद झाला. मी बॉसशी बोलून परत आलो तर मला वाटलं की मी पी.सी. बंद केला आहे. आणी मी सरळ निघून आलो. पण थोडया वेळाने माझ्या मित्राने मला पिंग केलं होतं, आणि कुणाचा तरी धक्का मॉनिटरला लागला आणि स्क्रीन चालू झाली. ते माझ्या कलिगच्या लक्षात आलं. मग त्यानंच तो मेल बनवून मला आणि सगळ्यांना पाठवला. हुश्श........!कसला घाबरलो होतो मी! वाचलो!

5 comments:

अनामित म्हणाले...

zakkas...mitra..jashil ka aata logout n karata

हेरंब म्हणाले...

हे पोस्ट टाकून झाल्यावर लॉगआउट केलंत ना? हा हा हा ..

अनामित म्हणाले...

हे हे हे ..आता कॉमेंटला रिप्लाइ करायला पण लॉग इन नाही करत की काय? :):)

अनामित म्हणाले...

शेवट बाकी झक्कास झाला. काम झाल की लॉग करण आवश्यकच आहे.

आदित्य चंद्रशेखर म्हणाले...

आता चेंज केलेला पासवर्ड आठवून आठवून लॉग इन करतोय! या प्रसंगामुळेच लॉग आउट करण्याचं लक्षात राहतंय!

टिप्पणी पोस्ट करा